अहमदनगर – सरकारी कुंपणाची नासधुस करुन अतिक्रमण थांबविण्याचा लष्कराचा असलेल्या प्रयत्नास अडथळा आणुन लष्करी जवानांना गलीच्च शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना 9 सप्टेंबर रोजी वडारवाडी येथील दीपनगर कॉलनी येथे प्लॉट नं.53 येथे घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, रामा शंकर हरिचरण सिंग, राधेश्याम (भाऊ), शिवशंकर, श्रीमती पार्वती (सुन, पुर्ण नाव माहिती नाही) (सर्व रा.प्लॉट नं.53, घर नं.285 दीपनगर कॉलनी वडारवाडी भिंगार) यांनी प्लॉट नं.53 मधील सरकारी कुंपणाची नासधूस केली. याची माहिती मिळाल्यानंतर तेथे आलेल्या वरिष्ठ सैन्य कर्मचार्यांनी त्यांना समजावून सांगितले की तुमचा रस्ता कोणीही अडविणार नाही ही कारवाई होत असलेले अतिक्रमण थांबविण्याचा प्रयत्न आहे असे सांगितले परंतू वरील चौघांनी त्यांचे काहीएक न ऐकता सैन्य कर्मचारी व अधिकार्यांना अरेरावीची भाषा केली. यावर अधिकार्यांनी नगर कोर्टातून निकाल लागलेला आहे, हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे असे समजाविले परंतु चौघांनी त्यांचे काहीएक न ऐकता सरकारी मालमत्तेचे (कंपाऊंडचे) नुकसान केले. व सर्व सैनिकांना शिवीगाळ करुन जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर अधिकार्यांनी या जागेत वहिवाट करु नका असे स्पष्ट सुनावले तरीही चौघांनी जागेतून वहिवाट करत सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे थांबविले नाही.
याप्रकरणी कॅम्प पोलिसांनी एपीओ विनोद श्रीराम गवळी (वय 38, आर्म्ड स्टॅटीक वर्कशॉप ईएमइ रा.संत गजानन नगर, वॉर्ड नं.8, चिखली बुलढाणा) यांच्या फिर्यादीवरुन भादविक 447, 186, 504, 506, 34 प्रमाणे अनाधिकाराने प्रवेश केल्याच्या गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास पोलिस नाईक गोरे हे करीत आहेत.
Post a Comment