तिकीटं कापली नाहीत, जबाबदाऱ्या बदलल्या- फडणवीस
माय नगर वेब टीम
मुंबई - भाजपने कोणाचेही तिकीट कापलेले नाही, फक्त जबाबदाऱ्या बदलल्या आहेत, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते शुक्रवारी मुंबईतील पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी त्यांना एकनाथ खडसे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, प्रकाश मेहता आणि राजपुरोहित या भाजपच्या बड्या नेत्यांची तिकीटे का कापण्यात आली, असा सवाल विचारण्यात आला.
या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी म्हटले की, पक्षामध्ये जबाबदाऱ्या बदलत असतात. त्यामुळे नेत्यांची तिकीट कापलं असं म्हणणं योग्य ठरणार नाही. ती जबाबदारी फक्त दुसऱ्या कार्यकर्त्याला देण्यात आली आहे. पक्षात अशाप्रकारे कार्यकर्त्यांच्या भूमिका बदलत असतात. काहीजण विधानसभेत असतात तर काहीजण विधानसभेबाहेर राहून पक्षाचे काम करतात, असे फडणवीस यांनी सांगितले
Post a Comment