नवी दिल्ली - तिहार तुरुंगात कैद असलेले माजी केंद्रीय मंत्री पी चिदंबरम यांची प्रकृती बिघडली असून त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.आयएनएक्स मीडिया केस प्रकरणी चिदंबरम यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) कोठडी सुनावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चिदंबरम यांना पोटदुखीचा त्रास झाला होता. यानंतर सोमवारी सकाळी अधिकाऱ्यांनी त्यांना तपासणी राम मनोहर लोहिया रुग्णालयात नेले केले होते. यानंतर त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले. एम्स डॉक्टरांनी चिदंबरम यांची तपासणी केल्यानंतर त्यांना कोणताही गंभीर आजार नसल्याचे सांगितले.
यापूर्वीही पोटदुखीच्या त्रासामुळे चिदंबरम यांना रुग्णालयात नेण्यात आले
चिदंबरम यांना 5 ऑक्टोबर रोजी पोटदुखी्या त्रासामुळे एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. साधारणतः तिहार तुरुंगातील कैद्यांना आरोग्य तपासणीसाठी दीन दयाळ उपाध्याय रुग्णालयात नेण्यात येते. मात्र जर चिदंबरम यांच्या तब्येतीची तक्रार असेल तर त्यांची एम्स, राम मनेहर लाहिया हॉस्पिटल किंवा सफदरजंग रुग्णालयात तपासणी करावी असे कोर्टाने आदेशात म्हटले आहे

Post a Comment