माय नगर वेब टीम
मुंबई - प्रमोशन ऑन व्हील्स प्रोजेक्ट सुरु होताच भारतीय रेल्वेच्या या सेवेला बॉलिवूडकडून जबरदस्त रिस्पॉन्स मिळाला आहे. अक्षय कुमारचा चित्रपट 'हाउसफुल-4'चा प्रचार करण्यासाठी 8 कोचची विशेष ट्रेन चालवल्यानंतर रेल्वेकडे आता असेच 7 प्रोजेक्ट्स रांगेत आहेत. रेल्वे अधिकाऱ्यांनुसार 'हाउसफुल 4' च्या प्रमोशननंतर रेल्वेला सुमारे 53 लाख रुपयांचे इन्कम झाले.
प्रमोशन ऑन व्हील्स सर्विसच्या सुरुवातीबरोबरच रेल्वेकडे 'दबंग-3', 'सांड की आंख', 'छपाक', 'लंच बॉक्स-2', 'पॅडमॅन -2' यांसारख्या चित्रपटांव्यतिरिक्त टीव्ही गेम शो ‘कौन बनेगा करोडपती’ आणि ‘द कपिल शर्मा शो’ चे प्रमोशन करण्यासाठी स्पेशल ट्रेन चालवण्याच्या प्रस्तावांवर विचार केला जात आहे.
3 महिन्यांपासून सुरु होती प्रक्रिया...
मागील सुमारे दोन महिन्यांपासून सर्विसच्या संबंधी बॉलिवूड आणि टीव्ही प्रोड्यूसर्ससोबत बातचीत सुरु होती. 7 ऑक्टोबरला याची घोषणा झाली आणि यानंतर लगेच मेकर साजिद नडियाडवालाने 'हाउसफुल-4' साठी बुकिंग केले. 8 कोचची ही ट्रेन 16 ऑक्टोबरला मुंबई सेंट्रलहून वडोदरा, रतलाम, कोटा असे मार्गक्रमण करीत 17 तसंच प्रवास केल्यानंतर 17 ऑक्टोबरला दुपारी दिल्लीला पोहोचली. यादरम्यान चित्रपटाची स्टार कास्ट ट्रेनमधेच होती.

Post a Comment