मतदान बुथवर पोलिसाला शिवीगाळ व धक्काबुक्की; गुन्हा दाखल






माय नगर वेब टीम
अहमदनगर – विधानसभा निवडणूक मतदान बंदोबस्ताचे काम करत असताना दोघांनी एका पोलिस कर्मचार्‍यास शिवीगाळ, धक्काबुक्की व दमदाटी करत सरकारी कामात अडथळा आणल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी परिसरातील माठ गावात मतदान केंद्र बुथ क्रमांक 150 येथे सोमवारी (दि.21) 12.40 वाजता घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, विधानसभा निवडणूक मतदान बंदोबस्ताचे श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी परिसरातील माठ गावात मतदान केंद्र बुथ क्रमांक 150 येथे शासकीय आदेशाप्रमाणे कर्तव्य बजावणारे पोलिस कर्मचारी महेश चंद्रभान हडवळे (नेमणुक सहाय्यक पोलिस आयुक्त कार्यालय मुंबई, रा.लिंगदेव, ता.अकोले, जि.नगर) यानी मतदान केंद्रात अनधिकृतपणे प्रवेश करणार्‍या दोघांनी हटकले असता त्यांनी हडवळे यांना शिवीगाळ व धक्काबुक्की करीत दमदाटी केली व सरकारी कामात अडथळा आणला. हडवळे यांनी अन्य सहकार्‍यांच्या मदतीने दोघांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता त्यांचे नावे सौरभ विजय हेगडे व विजय हेगडे (दोघे रा.माठ, ता.श्रीगोंदा) असल्याचे समजले.

याप्रकरणी बेलवंडी पोलिसांनी महेश हडवळे यांच्या फिर्यादीवरुन भादविक 353, 504, 506 व 34 प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली असून पुढील कारवाई पोलिस निरीक्षक माने हे करीत आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post