डीटीएच सेवेला २ कोटी लोकांचा रामराम


माय नगर वेेेब टीम

नवी दिल्ली – टेलिव्हिजन आणि ब्रॉडकास्टिंग सेक्टरसाठी टेलिकॉम रेग्युलेटरी अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया (ट्राय) च्या घोषनेनंतर भारतात नवे दर लागू झाल्यानंतर डीटीएच सेवा महाग झाली आहे. डीटीएच सेवेसह केबलच्या बिलात भरमसाठ वाढ झाल्याने लोक हैराण झाले आहेत. ट्रायने लोकांना पसंतीचे चॅनेल निवडण्याची मुभा दिली असली तरी डीटीएच सेवा महाग झाल्याने देशभरातील तब्बल २ कोटी लोकांनी डीटीएच सेवा सोडल्याची माहिती समोर आली आहे.

गेल्या वर्षीच्या दुसऱ्या तिमाहीच्या तुलनेत या वर्षी केबल बिलात २५ टक्के वाढ झाली आहे. या दरवाढीविरोधात वेळोवेळी संताप व्यक्त केल्यानंतरही त्याचा काहीही परिणाम झाला नसल्याने डीटीएच आणि केबल सेवा सोडणाऱ्यांची संख्या वाढली आहे. मार्च २०१७ मध्ये टेलिकॉम रेग्युलेटरी अथोरिटी ऑफ इंडियाने ब्रॉडकास्टिंग आणि केबल सर्व्हिससाठी नवीन आराखडा तयार
केला आहे. यात २९ डिसेंबर २०१८ ला लागू करण्यात आला. या नियमांनुसार ग्राहकांना आपल्या पसंतीचे चॅनेल निवडण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. हा नियम लागू झाल्यानंतर ग्राहकांना स्वस्त व कमी पैशांत डीटीएच सेवा व केबल सेवा मिळेल , असे मानले जात होते ; परंतु आधी कमी पैशांत मिळणारी सेवा महाग होत अव्वाच्या सव्वा झाली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post