मुख्यमंत्र्यांनी निकालाआधी घेतले केदारनाथाचे दर्शन
माय नगर वेब टीम
मुंबई – विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम आणि मतदान संपताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केदारनाथाचं दर्शन घेतलं. मे महिन्यात लोकसभा निवडणुकीचं मतदान झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीदेखील केदारनाथला भेट दिली होती.
विधानसभा निवडणुकीचा प्रचार शनिवारी (19 ऑक्टोबर) संपला. त्यानंतर सोमवारी (21 ऑक्टोबर) राज्यात मतदान पार पाडलं. आज मतमोजणी होणार आहे. तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तराखंडमधल्या केदारनाथाचं दर्शन घेतलं. मुख्यमंत्र्यांनी ट्विट करून याबद्दलची माहिती दिली. आज सकाळी केदारनाथाचं दर्शन आणि आशीर्वाद घेतले. हर हर महादेव!, असं मुख्यमंत्र्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. यावेळी पत्नी अमृतादेखील त्यांच्यासोबत होत्या.

Post a Comment