विनोद तावडे, प्रकाश मेहतांसह तीन विद्यमान आमदारांचा पत्ता कट, भाजपची चौथी यादी जाहीर



माय नगर वेब टीम

मुंबई - भाजपची सात उमेदवारांची चौथी यादी जाहीर करण्यात आली आहे.  मुक्ताईनगरमधून अखेर एकनाथ खडसे यांच्याऐवजी त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांचे नाव घोषित करण्यात आले आहे. तर बोरिवलीमध्ये विनोद तावडे यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. तावडे यांच्याऐवजी सुनील राणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दुसरीकडे मंत्री राहिलेल्या प्रकाश मेहता यांचा देखील पत्ता कट करण्यात आला असून त्यांच्या जागी पराग शाह यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर चंद्रशेखर बावनकुळे अजूनही वेटिंगवर आहेत. कुलाबा मतदारसंघामधून राहुल नार्वेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आतापर्यंत भाजपचे एकूण १५०  उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.



भाजप उमेदवारांची चौथी यादी

बोरिवली - सुनिल राणे

मुक्ताईनगर- रोहिणी खडसे

काटोल- चरणसिंह ठाकूर

घाटकोपर पूर्व - पराग शाह

तुमसर - प्रदीप पडोले

कुलाबा - राहुल नार्वेकर

नाशिक पूर्व - राहुल डिकळे

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post