पंकजाताईंंचा दारूण पराभव; धनंजय मुंडे विजयी
माय नगर वेब टीम
बीड - ‘परळीमध्ये मायबाप जनतेने न्याय दिला आहे. त्या न्यायाचा अर्थ काय ते मीडियाने काढावा. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व परळी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी दिली आहे. परळीमध्ये धनंजय मुंडे यांची सरळ लढत त्यांचीच चुलत बहीण व राज्याच्या महिला-बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्याशी झाली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी स्वत: पंकजा मुंडेच्या प्रचारासाठी सभा घेतल्या होत्या. मतदानाच्या आदल्या काही दिवसांमध्ये दोन्हीं मध्ये वैयक्तिक स्वरुपाची ‘तू-तू मै-मै; पाहायला मिळाली होती. त्या नंतर मतदानाच्या दिवशी ‘परळीच्या जनतेनं ठरवलंय’ अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी दिली होती.
नुकत्याच जाहीर झालेल्या निकालानुसार, धनंजय मुंडे यांनी 21 हजारांहून अधिक मतांची आघाडी घेतली आहे. यावेळी पूर्णपणे वेगळा निकाल लागण्याची निश्चितता आहे.

Post a Comment