'सत्तेचे समान वाटा हा मुख्यमंत्र्यांचा शब्द होता'
माय नगर वेब टीम
मुंबई - शिवसेना आणि भाजपमध्ये सत्तेचे समान वाटप होईल असे मुख्यमंत्रीच म्हणाले होते. त्यामुळे, आता देवेंद्र फडणवीस यांना फणा काढून दुसरे काही बोलण्याची गरज नाही अशी प्रतिक्रिया संजय राउत यांनी दिली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यात शिवसेनेला अडीच वर्षाचे मुख्यमंत्री पद देणार हे कधीच बोललो नाही. तसेच सत्ता स्थापनेसाठी 5-50 चा फॉर्मुला ठरलेला नाही असे म्हटले आहे. त्यावरच शिवसेनेचे नेते संजय राउत यांची रोखठोक प्रतिक्रिया समोर आली आहे.
दरम्यान, शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांची मंगळवारी बैठक होणार होती. परंतु, मुख्यमंत्र्यांनी शब्द फिरवल्याने ही बैठक रद्द करण्यात आली अशी माहिती पत्रकारांशी संवाद साधताना संजय राउतयांनी दिली. सोबतच, अमित शहा यांचा बुधवारचा मुंबई दौरा देखील पुढे ढकलला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
संजय राउत यांना मुख्यमंत्र्यांच्या विधानावर माध्यमांनी प्रश्न केले. त्यावर बोलण्यापूर्वी राउत यांनी एक जुनी क्लिप दाखवली. त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात सरकार स्थापनेसाठी शिवसेना आणि भाजपच्या 50-50 फॉर्मुलावर बोलताना दिसून आले. तीच क्लिप दाखवताना आता मुख्यमंत्री कसे काय बदलू शकतात. यावर आता शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेच बोलतील असेही राउत यांनी स्पष्ट केले

Post a Comment