माय नगर वेब टीम
अहमदनगर - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे कट्टर समर्थक, जुने कार्यकर्ते नगरचे माजी आमदार दादा कळमकर यांचे पुतणे नगरचे माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. एन निवडणुकीच्या माजी महापौर कळमकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने आमदार संग्राम जगताप यांना मोठा धक्का मानला जात आहे. कळमकर परिवार गेल्या 40 वर्षांपासून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ होता. दरम्यान माजी महापौर कळमकर यांनी जगताप यांचे नाव न घेता सडकून टीका केली. यावेळी उपनेते अनिल राठोड, खासदार सुजय विखे पाटील, दिलीप सातपुते, यांच्यासह नेते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Post a Comment