माय नगर वेब टीम
पारनेर –पारनेर- नगर विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार, निलेश लंके यांनी विजय मिळाल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची बारामतीमध्ये जाऊन भेट घेतली. यावेळी पवार यांनी लंके यांचे कौतुक केले. यावेळी पवार यांनी आमदार लंके यांच्या कार्याचे तोंडभरून कौतुक करताना माझ्या राष्ट्रवादी पक्षाला निलेश लंके नावाचा हिरा मिळाला आहे. माझ्या अपेक्षे पेक्षा जास्त मताधिक्य मिळवले असे म्हणत लंके यांचे कौतुक केले.
लंके गेली अनेक वर्ष प्रस्थापित राजकर्त्यांच्या विरोधात संघर्ष करत आहेत. शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केल्यापासून त्यांनी जनसंपर्क वाढविला व पारनेर तालुक्याचा आजवरच्या इतिहासात विक्रमी मतांनी निवडून आल्याने विक्रमादित्य म्हणून महाराष्ट्रभर पोहोचले. पवार यांच्या भेटीसाठी तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अनेक पदाधिकारी व मित्रांसमवेत बारामतीत दाखल होत त्यांनी आशीर्वाद घेतले.
यावेळी लंके यांच्या समवेत जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके , तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे,अशोक सावंत, बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड, उपसभापती दिपक पवार, संजय भोर, ऍड.राहुल झावरे, बबलू रोहकले, विक्रम कळमकर, बापू शिर्के, दादा शिंदे, ठकाराम लंके, सुदाम पवार,जयसिंग मापारी, दत्ता आवारी, राधाकृष्ण वाळूंज हरिदास जाधव, दादा झावरे, योगेश शिंदे, अजय लामखडे, यांच्यासह पारनेर- नगर तालुक्यातील अनेक सहकारी उपस्थित होते.


Post a Comment