भाजपची सत्तेची मस्ती जनता उतरवणार - मेहबूब शेख


माय नगर वेब टीम

राहुरी - भाजप सरकारला सत्तेची मस्ती चढली आहे. मात्र, ती किती दिवस चालणार हे आता जनता ठरविणार असल्याचे मत राष्ट्रवादी युवक काॅग्रसेच प्रदेश अध्यक्ष महेबुब शेख यांनी व्यक्त केले.

राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी येथे राष्ट्रवादी काॅग्रसचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांच्या प्रचारर्थ आयोजीत सभेत ते बोलत होते.या सभेच्या अध्यक्षस्थानी एकनाथ पाटील हापसे होते. पुढे बोलताना ते म्हणाले एक उच्च शिक्षित उमेदवार तर, दसरा सहावी नापास उमेदवार आता जनता ठरवणार कसा उमेदवार पाहिजे. राहुरी तालुका हा स्वभिमानी तालुका आहे. एखादा आमदार आपल्या भागिनीवर अन्याय करतो. हे आपले कीती दुर्देव आहे. जेऊर येथील कु.भाग्यश्री मोकाटे या तरुणीवर किती अन्याय केला.अशा माणसांना तुम्ही मत तर देता कसे? या सरकारने पवारांना ईडीची भिती दाखवली पण,पवार अद्याप शाहण्याला कळले नाही.तेव्हा, ईडीला केव्हा कळणार? या भाजप सरकारने अनेक तरुणांना बेरोजगारीच्या खाईत ढकलण्याचे काम केले.मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते असताना ओरडत होते. की,शेतकऱ्यांच्या आत्महत्या प्रकरणी ३०२ चागुन्हा दाखल करावा. आता पाच वर्षात १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. आता कोणावर गुन्हा दाखल करायचा? बीड जिल्ह्यात वेगळे भाषण करायचे आणि इकडे आल्यावर वेगळे भाषण करतात. तेथे म्हणतात तिकडचे पाणी बीडला आणु आणि येथे आल्यावर बोलतात पाणी जावु देणार नाही असे जनतेला येड्यात काढण्याचे काम भाजपाच्या नेत्यांनी केले आहे.पवारांनी काय केले म्हणतात तुमच्या गुजरातमधे भुकंप झाला तेव्हा पवार साहेब मदतीला धावुन आले होते हे विहरु नका.पवार साहेबांनी सर्व अल्पसंख्यकसह सर्व समाज्याच्या लोकांना अनेक पदे दिली आहे.तर, तुम्ही काय केले.आता वेळ आली आहे. हिशोब चुकता करण्याची प्राजक्त दादाला मतदान म्हणजे पवारांना मतदान आहे.मतदार संघाच्या विकासा बाबतीत चिंता करु नका दादांचे मामा भक्कम असल्याचे महेबुब शेख यांनी सांगितले.

यावेळी मा .खा. प्रसाद तनपुरे,जिल्हा परिषेदेचे सदस्य गोविंद मोकाटे,विठ्ठल मोकाटे,डाॅ.राजेद्र बानकर,विजय तमनर, कु.शितल तारडे,काॅ. गंगाधर काकडे,धिरज पानसंबळ,अतुल तनपुरे आदींनी मनोगत व्यक्त केले.याप्रसंगी माणिक तारडे, केशव हापसे, सभापती मनिषा ओहळ,सुनिल आडसुरे,गोकुळदास आढाव,शब्बीर शेख, रंगनाथ कोकाटे,बाळासाहेब देशमुख, सचिन ठुबे,काशिनाथ हापसे,सोमनाथ हापसे,गणपत जाधव,दादासाहेब हापसे,किसन मोकाटे,विलास गागरे,नामदेव म्हसे,हामिद इनामदार,नबिभाई देशमुख,दत्तात्रय मुसमाडे,शब्बिर देशमुख,विजय तमनर,बापुसाहेब नवाळे,सुभाष हापसे,शिवाजी राजदेव,विजय तमनर,सलीम शेख, डाॅ.काकासाहेब राजदेव, अॅड केरु पानसरे,दत्तात्रय डसुरे,नवाज देशमुख,बाबासाहेब भवार,रविद्र आढाव,रंगनाथ मोकाटे,विजय कातोरे आदी उपस्थित होते.दरम्यान ब्राह्मणीमधील शेकडो तरुणांनी

राष्ट्रवादी काॅग्रसमधे प्रवेश केला.. चॉकत:- ब्राह्मणीत शेतकरी संपाच्या काळात शेतकरी स्मशानभुमित आदोलन सुरु असताना आ. कर्डीले हे अंदोलनाकडे फिरकले नाही अशा निषक्रीय आमदाराला जागा दाखवण्याची आता वेळ आली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post