रस्त्यावर जनावरे सोडणाऱ्या ' त्या ' मालकांवर गुन्ह दाखल
माय नगर वेब टीम
अहमदनगर - शहरातील रस्त्यांवर जनावरे सोडणाऱ्या
सहा जणांवर महापालिकेने गुन्हे दाखल केले आहेत. महानगरपालिकेचे अधिकारी प्रशांत विजय रामदिन (रा.दिल्लीगेट) यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
दत्तू छगनराव गोंधळे, रवी दगडू गवळी, अशोक सूर्यभान निस्ताने, शांताराम छगनराव घुले, माधु भागोजी गोडकर (सर्व राहणार सिव्हिल हॉस्पिटल समोर गवळीवाडा अहमदनगर) , इक्बाल आयुब आयुब खान (रा.लालटाकी) अशी गुन्हा दाखल झालेल्या जनावरे मालकांची नावे आहे.
मोकाट जणावरांमुळे दररोज ठिक ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. तसेच अनेक छोटे मोठे अपघात होत आहेत. यामुळे महापालिका प्रशासनाने मोकाट जनावरांमुळे अपघात, अडथळा निर्माण झाल्यास त्या संबंधित मालकांवर गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला होता. गुरुवार 10 रोजी 12:30 वाजता चे सुमारास अप्पु हत्ती चौक ते पत्रकार चौक दरम्यान चे रोडवर सिव्हिल हॉस्पिटल समोर संबंधित मालकांनी जनावरे रस्त्यावर मोकाट सोडून त्या जनावरांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला तसेच नागरिकांचे जीवितास धोका उत्पन्न झाला. असे तक्रारीत म्हटलेे आहे. पुढील तपास पो. ना. चौधरी करीत आहेत.
Post a Comment