खासदारांना शिवीगाळ ; आमदार - कार्यकर्त्यांत राडा
माय नगर वेब टीम
अमरावती - ऐन दिवाळीच्या दिवशी बडनेराचे आमदार रवी राणा आणि शिवसेनेचे दिनेश बबु यांच्यात चांगलाच वाद झाला. या वादामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांत हाणामारी झाली. बडनेरापासून काही अंतरावर असलेल्या मधूबन वृद्धाश्रमात हा प्रकार घडला. खासदार नवनीत राणा यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्याने हा वाद निर्माण झाल्याचे समजते. या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. रवी राणा आणि दिनेश बुब वृद्धाश्रमात दिवाळीनिमित्त वृद्धांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी आले होते.
आमदार रवी राणा यांनी दिवाळीनिमित्त वृद्धाश्रमात छोटेखानी कार्यक्रम आयोजित केला होता. रवी राणा तेथे पोहोचल्यानंतर शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष दिनेश बुब यांचा तिथेच कार्यक्रम सुरु होता. यादरम्यान रवी राणा आणि दिनेश बुब यांच्यात काही कारणावरून बाचाबाची झाली आणि त्याचे हाणामारीत रुपांतर झाले. दरम्यान अद्यापही कोणाकडून पोलिस तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. दिनेश बुब यांनी खासदार नवनीत राणा यांना शिवीगाळ केल्यामुळे हा वाद झाल्याचे आमदार रवी राणा यांनी सांगितले. तर ही आमची संस्कृती नसून आमदार राणा यांनी वाद घातलेले ठिकाण योग्य नसून त्याला त्याच ठिकाणी मी उत्तर दिल्याचे दिनेश बुब यांनी माध्यमांना सांगितले.

Post a Comment