अवैध धंद्यांवर संक्रांत ; दारूचा मोठा साठा पकडला
माय नगर वेब टीम
अहमदनगर – भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता सुरु झाल्यापासून अहमदनगर राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैद्य दारुची विक्री करणा-या विरुध्द 140 गुन्हे दाखल केली आहेत. तसचे विभागाने 106 आरोपींना अटक करुन त्यांच्याकडून 28 लाख 33 हजार 830 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
विधानसभा निवडणूकीच्या काळात अवैद्य दारु विक्री मोठया प्रमाणात होत असते या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, राज्य उत्पादन पुणे विभागाचे उप आयुक्त प्रसाद सुर्वे यांच्या निर्देशानुसार अहमदनगर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक पराग नवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हयातील सर्व कार्यकारी अधिकारी व भरारी पथक क्र.1 अहमदनगर व भरारी पथक क्र. 2 श्रीरामपूर यांच्या संयुक्त पथकाने कारवाई केली आहे.
अहमदनगर जिल्हयात दिनांक 21 सप्टेंबर 2019 ते दिनांक 9 ऑक्टोबर 2019 या कालावधीत एकूण 144 गुन्हे नोंदविण्यात आले असून 110 आरोपीना अटक रण्यात आलेली आहे. या गुन्हयात देशी दारु 1 हजार 175 ब.लिटर, विदेशी दारु 244 ब लिटर, बिअर 55 ब लि, रसायन 27 हजार 860 लिटर , हातभट्टी दारु 1 हजार 411 लिटर, ताडी 1 हजार 496 लिटर परराज्यातील मद्य 423 ब लि. तसेच दुकाची व चार चाकी 17 वाहने जप्त करण्यात आले आहे. असे एकूण 28 लाख 23 हजार 830 चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
तसेच सीएल-3 किरकोळ देशी दारु चे 8 प्रकरणे, एफएल-3 परमीट रुम 10 प्रकरणे व एफएल-2 वाईन शॉप 3 प्रकरणे अशी अनुज्ञप्तीवर विभागीय नियमभंग प्रकरणे नोदविण्यात आलेली आहेत. ही कार्यवाही निरीक्षक संजय सराफ, ए बी बनकर, बी टी घोरतळे, उत्तम बडे, रोहिदास वाजे, अनिल पाटील व दशरथ जगताप यांच्या पथकातील दुय्यम निरीक्षक सहा, दु. निरीक्षक , जवान वाहन चालक यांचा ही या कारवाईत सहभाग आहे.

Post a Comment