'ही' अभिनेत्री खेळली नगरमध्ये दांडिया
माय नगर वेब टीम
अहमदनगर - देवीच्या रुपात आपण स्त्री शक्तीचे अनेक रुपे पाहत असतो. महिलांना आपल्या जीवनात आनंद, प्रेरणा आणि शक्ती देण्याचे काम या विविध रुपातून मिळते. नवरात्रोत्सवात भक्ती आणि शक्ती देणार्या देवीची आरधाना ही आपल्याला वर्षभर ऊर्जा देण्याचे काम करत असते. आपल्या संस्कृतीचे दर्शन अशा विविध उत्सवातून पहायला मिळते. ही संस्कृती जपण्याचे काम आपण केले पाहिजे. अशा सण-उत्सवातून माणसे जोडण्याचे समाज एकत्र येण्याचे काम होत असते आनंद तरुण मंडळाच्यावतीने नवरात्रोत्सवात विविध उपक्रमातून राबवून सर्वांच्या आनंदात भर घातली आहे, असे प्रतिपादन अभिनेत्री तेजा देवकर यांनी केेले.
स्टेशनरोड वरील आनंद तरुण मंडळाच्यावतीने कोजागिरी पौर्णिमेनिमित्त अभिनेत्री तेजा देवकर यांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली. याप्रसंगी रेवती भुतारे, मोनिका लालबागे, कोमल मेहेर, रुपाली भुतारे, मंडळाचे मार्गदर्शक नितीन भुतारे, गणेश लालबागे, संतोष मेहेर, राजू मणियार, सतीश खताडे, लाभेश फिरोदिया, श्रीकांत गायकवाड, विशाल मंचरकर, निलेश भुतारे, अनिल गांधी, चेतन फिरोदिया, ईश्वर वाघुले, आनंद गुगळे, विशाल भगत, संतोष वाकळे, संतोष कानडे, राजू शिर्के, विनय सेगल आदि उपस्थित होते.
यावेळी रेवती भुतारे म्हणाले, दरवर्षी नवरात्रोत्सवात मंडळाच्यावतीने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते. त्याचबरोबरच विविध सांस्कृतिक कार्यक्रमात दांडिया, गरबा, विविध स्पर्धांच्या माध्यामातून आयोजित करुन कला-गुणांना वाव देण्याचे काम होत आहे.
यावेळी नितीन भुतारे म्हणाले, मंडळाच्यावतीने नवरात्रोत्सवात विविध कार्यक्रम होत आहेत. त्याचबरोबरच वर्षभर सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून समाजिक काम होत असते. अभिनेत्री तेजा देवकर यांच्या उपस्थितीमुळे मंडळाच्या कार्यास प्रोत्साहन मिळत आहे.
यावेळी अभिनेत्री तेजा देवकर यांनी उपस्थितांसमवेत दांडिया खेळण्याचा आनंद लुटला. यावेळी नवरात्रोत्सवात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण अभिनेत्री तेजा देवकर यांच्या हस्ते करण्यात आले.
Post a Comment