ते कोणत्याही पदावर नव्हते; राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्षांचा खुलासा
माय नगर वेब टीम
अहमदनगर - राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे प्रदेशध्यक्ष किरण काळे यांनी पदाचा राजीनामा दिल्याचे पत्रकार परिषद घेऊन सांगितले होते. याबाबत राष्ट्रवादी काँग्रसेचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार यांनी याबाबत खुलासा केला आहे. किरण काळे हे राष्ट्रवादी प्रदेश कार्यकारणीतील पदावर नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.
नगरमधून नगरसेवक कुमार वाकळे यांचा प्रदेश उपाध्यक्ष म्हणून उल्लेख आहे. तर युनूस शेख प्रदेश सरचिटणीस व अभिषेक खंडागळे कार्यकारिणी सदस्य असल्याची यादी माध्यमांना दिलीआहे. किरण काळे हे अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष असल्याचे सांगत असले, तरी ते कोणत्याही पदावर नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.
Post a Comment