पवारांसोबतच्या चर्चेनंतर अजित पवार २० तासांनंतर पहिल्यांदाच बोलले...
माय नगर वेब टीम
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या तडकाफडकी राजीनाम्यानंतर ते अज्ञातवासात गेले होते. मात्र आता अजित पवार हे शरद पवार यांच्या निवासस्थानी दाखल झाले. इथं शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार, भाऊ श्रीनिवास पवार आणि पवार कुटुंबातील इतर सदस्य उपस्थित होते. कुटुंबातील सदस्यांसोबतच्या चर्चेनंतर अजित पवार माध्यमांसमोर आले. दरम्यान ३.३० वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान(वाय बी.सेंटर) येथे पत्रकार परिषद घेऊन अजित पवार आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.
दरम्यान शरद पवार म्हणले, 'तुम्हाला जे काही ऐकायचंय ते अजित पवार यांच्या तोंडूनच ऐका' असं उत्तर शरद पवार यांनी दिलंय. यावेळी, 'ऑल इज वेल?' असा प्रश्न पवारांना केला गेला. यावर त्यांचं उत्तर होतं 'तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरून वाटतं का की काही झालंय?' असे सांगत अजित पवार पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे ते म्हणाले
Post a Comment