सागर औटी फॅमिली सलोन स्पा अकॅडमी च्या वतीने आंतरराष्ट्रीय हेअर डिझाईनर उदय टक्के यांचे सोमवारी सेमिनार


माय नगर वेब टीम

अहमदनगर - अहमदनगर येथील आंतरराष्ट्रीय डिझाईनर सागर औटी फॅमिली सलोन स्पा अकॅडमी च्या वतीने सोमवार दिनांक 30 सप्टेंबर 2019 रोजी भव्य एक दिवसीय सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. हा सेमिनार सलून व्यावसायिक व ब्युटी पार्लर अशा दोन्ही साठी आहे. यावेळी या क्षेत्रातील नवनवीन बदल आणि तंत्रज्ञान याविषयी प्रात्यक्षिकांसह माहिती देण्यात येणार आहे. या सेमिनारमध्ये अहमदनगर मधील उत्कृष्ट व्यावसायिकांचा सन्मानही करण्यात येणार आहे. तरी सर्व व्यावसायिकांनी व बांधवांनी याचा लाभ घ्यावा असे आव्हान अकॅडमीचे संचालक सागर अटी व स्नेहल सागर औटी यांनी केले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post