ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांचं वृद्धापकाळाने निधन
माय नगर वेब टीम
मुंबई - मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांचं सोमवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झालं आहे. वयाच्या ७८व्या वर्षी त्यांनी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी कारकिर्दीमध्ये ३०० हून अधिक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं होतं. खासकरून शोले चित्रपटामध्ये त्यांनी केलेली कालियाची भूमिका आणि ‘सरदार मैंने आपका नमक खाया है’, हा डायलॉग प्रेक्षकांच्या आणि त्यांच्या चाहत्यांच्या विशेष लक्षात राहिला. अंदाज अपना अपना या आमिर खान आणि सलमान खानच्या प्रमुख भूमिका असलेल्या सिनेमातली त्यांची रॉबर्ट ही भूमिका देखील विशेष गाजली. त्यांच्या निधनावर सिनेसृष्टीमधून शोक व्यक्त केला जात आहे.
Post a Comment