शहरातील राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला विकासाचे व्हिजन नाही- काळे ; पद व पक्षाला केला रामराम


माय नगर वेब टीम
अहमदनगर - राष्ट्रवादीचे काँग्रेसच पक्षाचे स्थानिक नेतृत्व शहराच्या उज्वल भवितव्याच्या दृष्टीने योग्य नाही. शहरात नेतृत्व करण्यासाठी शहरात लायक नेतृत्व दिले जावे, यासाठी पक्षाकडे कायम आग्रह धरला होता. त्यामुळे माझी नगर शहरातील नेतृत्वाशी काम करण्याची इच्छा नसल्याचे सांगत राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष व सदस्यपदाचा राजीनामा देत असल्याचे किरण काळे यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.

नगर शहराच्या विकासासाठी विकासाचे व्हिजन असणार्‍या योग्य नेतृत्वाची गरज आहे. मी पक्षाच्या व्यासपीठावर अनेक वेळेला याबाबत परखडपणे भूमिका मांडलेली होती. मात्र पक्ष देखील पुन्हातेच नेतृत्व दिले जात आहे.त्यामुळे आता माझी मानसिकता नाही. मला व सामान्य नगरकरांना प्रतीक्षा असणार्‍या नगर शहराच्या विकासाच्या दृष्टीने मी लवकरच महत्वपूर्ण निर्णय घेणार आहे. याच कारणांमुळे मी माझ्या पदाचा आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा पक्षाकडे अत्यंत जड अंतःकरणाने पाठवला असल्याचे ते म्हणाले.



मनपा निवडणुकीच्या वेळी आदरणीय शरद पवार साहेबांनी सांगून देखील स्थानिक नेतृत्वाने पक्ष विरोधी निर्णय घेतला. कायम पक्षाला वेठीस धरण्याचा प्रयत्न केला. आत्ता देखील सर्व पक्षांचे उंबरठे झिजवून झाल्या नंतर स्वतःच्या प्रसिद्ध कार्यशैलीमुळे (?) आपल्याला कुणीही कोणत्याच पक्षात प्रवेश द्यायला तयार नाही हे लक्षात आल्या नंतर यांना पुन्हा राष्ट्रवादीची आठवण झाली. पक्ष निष्ठा कायम वेशीवर टांगणा-यांकडून यापेक्षा वेगळी अपेक्षा काय असू शकते असे ही म्हणाले.



शहराच्या पातळीवरती अनेक वर्ष ज्या नेतृत्वा बरोबर मला काम करण्याची अपरिहार्यता होती त्यातून माझी कायम घुसमटच झाली. कधीही शहर विकासाच्या बाबतीमध्ये सदर नेतृत्वाने गांभीर्य दाखवले नाही. स्थानिक नेतृत्वाला विकासापेक्षा इतर प्रकारच्या राजकारणातच अधिकचा रस असल्यामुळे आमच्यामध्ये कधीच मनोमिलन होऊ शकले नसल्याचे काळे यांनी सांगितले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post