निलेश आगरकर @ माय नगर
श्रीगोंदा - उद्यापासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होत आहे असे असतांना श्रीगोंदा- नगर मतदारसंघातील नेते मात्र गप्पगार आहेत. माजी मंत्री बबनराव पाचपुते हे गत पंचवार्षिक ला भाजपवासी झाले. आताच्या निवडणुकीत आमदार राहुल जगताप, काँग्रेसचे नेते राजेंद्र नागवडे हेही कमळाच्या प्रेमात पडले असल्याचे बोलले जात असून त्यांच्याकडून मात्र यास अजून काही ठरलेलं नसल्याचे सांगण्यात येत आहे. विरोधी पक्षातील नेतेच भाजपाच्या संपर्कात असल्याने माजी मंत्री पाचपुते यांची वाट मात्र बिकट झाली आहे.
काँग्रेसचे नेते नागवडे कारखाना अध्यक्ष राजेंद्र नागवडे व राष्ट्रवादीचे आमदार राहुल जगताप हे मागील काही दिवसांपासून भाजपच्या संपर्कात असल्याच्या चर्चा होत आहेत. त्यातच या नेत्यांचे मुख्यमंत्र्यांसोबतच्या भेटीचे फोटो देखील कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावर व्हायरल केले जातायेत. त्यामुळे नागवडे व जगतापांची नेमकी भूमिका काय याबाबत सध्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. तालुक्यात सध्या गल्लीबोळात, पारावर, कट्ट्यावर सगळीकडे उमेदवारीवरून एकच चर्चा कस होईल, काय होईल याच गप्पा रंगत आहेत. परंतु नेत्यांची भूमिका मात्र अजूनही गुलदस्त्यातच आहे.
राजेंद्र नागवडे व राहुल जगताप हे दोघेही आम्ही एकत्रच आहोत आमच्यातुन एकच उमेदवार निवडणूक लढवेल असे सांगत असले तरी नेमके या दोघांमधून कोण उमेदवारी करणार आणि कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार याबाबतही संभ्रम आहे. तसेच एकीचा नारा देणारे जगताप व नागवडे दोघेही आप आपल्या पद्धतीने उमेदवारीसाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे उमेदवारीवरून एकीत बेकी होणार की एकी कायम राहणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. दोन दिवसांपूर्वीच नागवडे कारखाना अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी हर्षवर्धन पाटलांच्या माध्यमातून मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची माहिती समजते. नागवडे यांच्या या भेटीमुळे त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चाना उधाण आले आहे. त्यातच आमदार राहुल जगताप यांचे काही निकटवर्तीय आजही जगताप हेच भाजपकडून उमेदवार असतील असे आत्मविश्वासाने बोलत आहेत.
तसेच वेळ पडली तर जगताप हे शिवसेनेत जातील असेही बोलले जात आहे. नेत्यांच्या निवडणुकीच्या तोंडावरील मुंबई वाऱ्या, नेत्यांच्या भेटीगाठी यामुळे कार्यकर्ते मात्र सैरभैर झाले आहेत. नेतेच अजून शांत असल्यामुळे कार्यकर्ते मात्र नाराज आहेत. तर दुसरीकडे भाजपचे बबनराव पाचपुते यांनी तालुक्यातील महिलांना देवदर्शन घडवून आणत वैयक्तिक भेटीगाठींवर जोर देऊन विधानसभेची जोरदार तयारी केली आहे. अनेक दिवसांपासून अज्ञातवासात असणारे पाचपुते यांचे पुत्र विक्रमसिंह पाचपुते हे देखील वडिलांच्या प्रचारात आता सक्रिय झाले आहेत. दि१ऑक्टोबर रोजी पाचपुते हे भाजप कडून विधानसभेचा उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे समजते तर दुसरीकडे नागवडे, जगताप यांचा कोणत्या पक्षाकडून उमेदवारी करायची हा घोळ मात्र सुरूच आहे. हे दोघे अजूनही आपल्याला भाजपकडून उमेदवारी मिळेल या आशेवर भाजपच्या संपर्कात आहेत. त्यामुळे तालुक्यात नेमकी कशी लढत होणार याबाबत सर्वानाच उत्सुकता लागली आहे.

या प्रमुख नेत्यांच्या धरसोडपणात घनश्याम शेलार यांनी मात्र राष्ट्रवादीकडून विधानसभा लढवण्याच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीकडून कोण उमेदवारी करणार नागवडे,जगताप यांची भूमिका काय राहणार याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. आज श्रीगोंदयात झालेल्या पवार यांच्यावरील खोट्या गुन्ह्याचा निषेध करण्यासाठी आयोजित सभेजवळून नागवडे गेले तरी सभेकडे त्यांनी पाठ फिरवल्यामुळे नागवडे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण आले आहे. नागवडे व जगताप या दोघांनी कोणताही पक्ष असला तरी एकत्र राहूनच निवडणूक लढवावी असा आग्रह त्यांचे कार्यकर्ते करत आहेत. परंतु निवडणुका तोंडावर आल्यात तरी नेत्यांच काही ठरत नसल्यामुळे तालुक्यातील नेत्यांवर विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती अशी म्हणण्याची वेळ आली असून नेत्यांच्या हातात कोणताही झेंडा असला तरी त्या झेंड्याचा दांडा धरणारे कार्यकर्ते मात्र नेत्यांच्या गोंधळामुळे पुरते हैराण झाले आहेत.
Post a Comment