घोसपुरी सोसायटीने उतरविला शेतकरी सभासदांचा सुरक्षा विमा
माय नगर वेब टीम
अहमदनगर- नगर तालुक्यातील घोसपुरी येथील विविध कार्यकरी सेवा सहकारी सोसायटीने सर्व शेतकरी सभासदांचा नागरिक सुरक्षा अपघात विमा उतरविला आहे. संस्थेच्या नुकत्याच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात आला आहे.
सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा पंचायत समितीचे माजी सभापती अशोक झरेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. तसेच संस्थेच्या सर्व शेतकरी सभासदांचा सुरक्षा विमा उतरविण्याची संकल्पना चेअरमन रामदास कवडे व माजी चेअरमन सुनील ठोकळ यांनी मांडली. या अभिनव संकल्पनेचे सर्वांनी एकमताने स्वागत करत हा ठराव मंजूर केला. त्यानुसार ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीकडे सोसायटीच्या सर्व शेतकरी सभासदांचा नागरीक सुरक्षा अपघात विमा उतरविण्यात आला आहे.
सर्वसामान्य शेतकरी हा आपल्या स्वत:च्या आरोग्याकडे कायमच दुर्लक्ष करत शेतीच्या कामात गुंतलेला असतो. बहूत श शेतकरी हे अशिक्षीत असल्यामुळे तसेच त्यांना विमा पॉलेसीचे सुरक्षा कवच असावे याबाबत फारसे ज्ञान नसल्याने त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे या सभासदांच्या हितासाठी संस्थेच्या वतीने हा निर्णय घेण्यात आल्याचे चेअरमन रामदास कवडे व माजी चेअरमन सुनील ठोकळ यांनी सांगितले.
या सभेस व्हा.चेअरमन बाबूराव घोडके, संचालक विठ्ठल गोबरेख सोमनाथ झारेकर, विल स झरेकर, प्रदीप झरेकर, नानासाहेब गाढवे, संदीप लांडगे, संतोष पारधे, राजू पाचारणे, सौ. बेबी घोडके, भागूबाई खोबरे, अशोक झरेकर, सदाशिव हांडोरे, सचिव सुर्नल झरेकर, मोहन इधाते यांच्यासह सभासद उपस्थित होते. सोसायटीच्या वतीने सभासदांचा सुरक्षा विमा उतरविण्याचा घेतलेल्या निर्णयाचे सभासदांनी स्वागत केले आहे.
Post a Comment