शिवसेनेच्या तिकिटासाठी तोबा गर्दी ; यांनी दिल्या मुलाखती


माय नगर वेब टीम

अहमदनगर- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील मतदारसंघातील शिवसैनिकांनी मुंबईत शिवसेना भवनात सकाळपासून हजेरी लावून उमेदवारीसाठी मुलाखती दिल्या. नगर शहर मतदारसंघातून उपनेते अनिल राठोड यांच्यासह माजी महापौर शिला शिंदे, माजी महापौर सुरेखा कदम यांचे पती व माजी शहर प्रमुख संभाजी कदम, माजी महापौर भगवान फुलसौन्दर, बाळासाहेब बोराटे यांनी मुलाखती दिल्या. नगरमध्ये इच्छुकांची संख्या वाढल्याने उपनेते अनिल राठोड यांची डोकेदुखी वाढली आहे. दरम्यान जिल्ह्यातून अनेकांनी उमेदवारी वर दावा करत मुलाखत दिली.

दरम्यान, यावेळी जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांच्यासह शहर प्रमुख दिलीप सातपुते व अन्य पदाधिकारीही उपस्थित होते. शिवसेना भवनात विधानसभेसाठी जिल्ह्यातून इच्छुक असणार्‍यांच्या मुलाखती आज घेण्यात आल्या. सकाळच्या सत्रात इच्छुकांनी अर्ज घेतले. राठोड यांच्या समवेत महापालिकेतील नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते.

दरम्यान, संदेश कार्ले यांनी पारनेर आणि श्रीगोंदा या दोन्ही मतदारसंघातून उमेदवारी मागितली... पारनेरमध्ये आपण कसे दावेदार आहोत हे श्रेष्ठीना पटवून दिले.. राहुरीमधून गोविंद मोकाटे व अनिल कराळे, शरद झोडगे यांनी उमेदवारीची मागणी केली.बुधवारी मातोश्रीवर दिवसभरात अहमदनगर जिल्ह्यातील विविध मतदारसंघातुन बहुतांश इच्छुकांनी मुलाखती दिल्या. विधानसभा मतदारसंघ निहाय नाव - अकोले- मधुकर तळपाडे, शकुंतला दराडे, सतिष भांगरे, मारुती मेंगाळ, कोपरगाव- राजेंद्र झावरे, प्रमोद लबडे, बाळासाहेब जाधव वनितीन औताडे, शिर्डी:- कमलाकर कोते, राजेंद्र पठारे, अनिल बांगरे, विजय काळे, कर्जत व जामखेड- राजेंद्र दळवी व दिपक शहाणे, शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघातून अविनाश मगरे, रामदास गोल्हार, अंकुश चितळे, दराडे , नगर - पारनेर - संदेश कार्ले आदींचा समावेश आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post