माय नगर वेब टीम
अहमदनगर - जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी विधानसभा निवडणूक निर्भय, मुक्त, शांतपणे पार पाडण्यासाठी जिल्ह्यातील तब्बल ४२८ जणांचे शस्त्र परवाने रद्द केले आहेत. यापैकी काही जणांचे शस्त्र परवाने हे गुन्हे दाखल असण्याच्या पार्श्वभूमीवर तर शस्त्र परवाने असूनही शस्त्र न घेतल्या मुळे उर्वरित परवाने रद्द केले आहेत. तसेच १ हजार १४१ जणांना आचारसंहिता संपेपर्यंत शस्त्र जमा करण्याचे फर्मान जारी केले आहे. जिल्हादंडाधिकारी व्दिवेदी यांनी कारवाई केली आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हादंडाधिकाऱ्यांकडे शस्त्र परवाने रद्द करीत संबंधित व्यक्तींकडील शस्त्रे जमा करण्यासंदर्भात आदेश होण्याबाबत प्रस्ताव दाखल करण्यात आले होते. पोलिस अधीक्षक यांच्याकडून हा प्रस्ताव दाखल करताना विधानसभा निवडणूक निर्भय, मुक्त, शांततेत पार पाडण्यासाठी ज्या शस्त्रपरवानाधारकांवर गुन्हे दाखल आहेत,त्यांचे शस्त्रे परवाने रद्द करून, शस्त्रे जमा करून घेण्याबाबत विनंती करण्यात आली होती. जिल्हादंडाधिकाऱ्यांनी या प्रस्तावांवर साधक-बाधक विचार करून एकूण ४२८ शस्त्रपरवानाधारक व्यक्तींचे शस्त्रपरवाने रद्द केले आहेत.हे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक व संबंधित पोलिस निरीक्षकांना जारी करीत याबाबतच्या कारवाईचा अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यासोबतच विधानसभा निवडणूक काळात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या हेतूने पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून काही व्यक्तींची शस्त्र जमा करण्यासंबंधी जिल्हा दंडाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव प्राप्त झाले होते. या प्रस्तावावर अंतिम निर्णय देत जिल्हादंडाधिकारी व्दिवेदी यांनी विधानसभा निवडणूक आचारसंहितेच्या काळापर्यंत जिल्ह्यातील १ हजार १४१ परवानाधारक व्यक्तींची शस्त्र जमा करण्याचे फर्मान जारी केले आहे.
यांचे शस्त्र परवाने रद्द
विठ्ठल जगन्नाथ काकडे (काष्टी), बबनराव भिकाजी पाचपुते (काष्टी), रावसाहेब सीताराम दातीर (लिंपणगाव), श्यामराव तात्यासाहेब नागवडे (वांगदरी),पोपट आनंदराव खेतमाळीस (श्रीगोंदे), घनश्याम प्रतापराव शेलार (वडाळी), भाऊसाहेब बबन होले (श्रीगोंदा), बाबासाहेब सहादू भोस (श्रीगोंदा),सदाशिव भिकाजी पाचपुते (काष्टी) आणि अजित रामचंद्र फाटके (खरवंडी, ता. नेवासा).
यांची शस्त्र होणार जमा
नरेंद्र घुले पाटील, चंद्रशेखर घुले पाटील, यशवंतराव गडाख, नंदकुमार झावरे, विजय औटी, अरुण जाधव, सुनील साळवे, राजेश परजणे, सुमित कोल्हे, अशोक काळे, विजय गडाख, प्रशांत गडाख, ज्ञानदेव पठारे, अशोक सावंत, सबाजी गायकवाड, प्रभाकर कवाद, पांडुरंग अभंग, विश्वासराव गडाख, अरुण तनपुरे, चंद्रशेखर कदम, विठ्ठलराव लंघे, रामदास गोल्हार, सुभाष पाटील, उदयसिंह पाटील, अविनाश आदिक, संजय फंड, अंजुम शेख, संजय छल्लारे, बाळासाहेब गिरमकर, भगवानराव पाचपुते, सिद्धेश्वर देशमुख, राजेंद्र पिपाडा, प्रभाकर बोरावके, बाजीराव खेमनर, अंकुश यादव, प्रताप झिने, लहू कानडे, शिवाजीराव अनभुले, बाबासाहेब सानप, नितीन वाकळे, अविनाश मोरे, वैभव जगताप, उबेद शेख, शिवाजी कराळे, नितीन जगताप, उमेश गिल्डा, राजेंद्र चोपडा, राजेश एकाडे, रफीउद्दीन शेख, सतीशकुमार लांडगे, ब्रिजलाल सारडा, चंद्रकांत गाडे, अमोल जाधव इत्यादी १ हजार १४१.
Post a Comment