माझ्यावर गुन्हा दाखल झाल्याने अजित पवार अस्वस्थ : शरद पवार






माय नगर वेब टीम
पुणे - अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा दिला ही बातमी मला पुण्याला येताना समजली. मला यासंदर्भातली मला कोणताही कल्पना नव्हती. मी त्यांना, त्यांच्या कुटुंबीयांना संपर्क साधला.  असं शरद पवार यांनी पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं. अजित पवार म्हणाले की, शिखर बँक घोटाळा प्रकरणात ज्या काही घडामोडी घडत आहेत त्याला मी तोंड देतो आहे. मात्र यात काकांचं  म्हणजे माझं  नाव आल्याने मी अस्वस्थ झालो. त्यांच्यामागे चौकशीचं शुक्लकाष्ठ मागे लागलं आहे त्याच उद्विगनतेतून अजित पवार यांनी राजीनामा देत असल्याचं कुटुंबीयांना सांगितलं. अशी माहिती शरद पवार यांनी दिली.

मी कुटुंबप्रमुख म्हणून मी अजित पवार यांची भेट घेणार आहे. त्यांच्या राजीनाम्याचं कारण मलाही जाणून घ्यायचं आहे. अजित पवार यांनी पार्थ पवार यांच्याशी चर्चा केली. राजकारणात इतक्या खालच्या पातळीचं राजकारण सुरु आहे असं म्हणत अजित पवार यांनी त्यांच्या मुलाशी चर्चा केली. आपण राजकारणात न राहिलेलं बरं असंही त्यांनी बोलून दाखवलं. माझ्याशी त्यांच्याशी काहीही चर्चा झालेली नाही. त्यांच्याशी चर्चा झाली की मी याबाबत बोलू शकेन असंही पवार यांनी स्पष्ट केलं.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post