नगर शहरात एकही मतदान केंद्र संवेदनशील- अतिसंवेदनशील नाही


माय नगर वेब टीम
अहमदनगर- २२५ अहमदनगर शहर मतदार संघात आचार संहीता सुरू झाली आहे. तसा आचार संहीता कक्ष नगर तहसिल कार्यालयात स्थापन करण्यात आला आहे. २८९ मतदान केंद्रामध्ये एकही संवेदनशील किंवा अति संवेदनशील मतदान केंद्र नाही. सी व्हीजील अॅप वर कोणीही आचार संहिता भंगाची तक्रार केल्यास पुढील १०० मिनीटांत त्या तक्रारीवर कार्यवाही करण्यात येईल अशी माहीती २२५ नगर शहर विधान सभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी श्रीनिवास अर्जून यांनी दिली.
अहमदनगर तहसील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेवेळी ते बोलत होते. यावेळी तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उमेश पाटील, नायब तहसिलदार अभिजीत बारवकर उपस्थित होते.यावेळी बोलताना श्रीनिवास अर्जून म्हणाले की नगर शहर विधानसभा मतदार संघात २ लाख ८९ हजार १६४ मतदार आहेत. त्यात पुरूष मतदार १ लाख ४८ हजार ८७९ असून स्त्री मतदार हे १ लाख ४० हजार २११ व इतर ७४ मतदार आहेत. नगर शहरात २८९ मतदार केंद्र असून निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसारच्या नियमानुसार एकही संवेदनशील किंवा अतिसंवेदनशीत मतदान केंद्र नाही.नगर तहसील कार्यालयात आचारसंहिता कक्षाची स्थापना करण्यात आली असून सभा आणि इतर परवानग्या त्या ठिाकणाहून देण्यात येतील. येत्या ४८ तासात शासकिय कार्यालय परिसर, सार्वजनिक परिसर आणि त्यानंतर खाजगी मालमत्ता भागातील फलक हटविण्यात येणार आहेत. उमेदवार ऑन लाईन किंवा ऑफ लाईन पदधतीने उमेदवारी अर्ज दाखल करू शकतात त्यासाठी सुविधा अॅप तयार आहे. निवडणूक कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाची तयारी झाली आहे. तसेच मशील सिलींग व्यवस्था नागापूर येथे करण्यात येणार आहे.


सी व्हीजील अँपचा धाक
आचार संहिता भंगाबाबत तक्रार करण्यासाठी सी व्हीजील अॅप तयार आहे. त्यावर कोणत्याही ठिकाणी आचार संहिता भंग होत असेल तर कोणीही त्यावर फोटो , व्हीडीओ टाकून तक्रार करू शकतात. १०० मिनीटांच्या आत त्या तक्रारीवर कार्यवाही केली जाईल आमचे कर्मचारी संबंधीत ठिकाणी तातडीने जातील. तसेच सोशल मिडीयावर नजर ठेवली जाणार असून त्यासाठी एमसीएमसी कमिटी गठीत करण्यात आली आहे. ३ फ्लाईंग स्कॉड, ३ बैठे पथक,तर ३ व्हीडीओ पथकही तयार करण्यात आले आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post