शेतकऱ्यांची सरकारकडे मागणी । सोसायटी सर्वसाधारण सभेत ठराव
माय नगर वेब टीम
अहमदनगर- सरकारने घोळत ठवलेल्या सरसकट कर्जमाफीबाबतचा विषय तात्काळ मार्गी लावावा असा ठराव ब्राह्मणी व मोकळ ओहळ विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. ब्राह्मणीत चेअरमन पंडित हापसे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित सर्वसाधारण सभेत सचिव अशोक आजबे यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचून अजेंठ्यावरील विषयाचे वाचन केले. दरम्यान सोसायटीच्या माध्यमातून नव्याने बांधण्यात येणारे शॉपिग सेंटर, नवीन राष्टीयकृत बँक आदींबाबत सविस्तर चर्चा झाली. सभासदांच्या मुलींच्या लग्नकार्यासाठी सोसायटीच्या मालकीचे मंगल कार्यालय बांधकाम करण्यात येणार असल्याची माहिती बाळकृष्ण बानकर यांनी दिली. ब्राह्मणी सहकारी बँकेकडून एटीएम बसविण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. संचालक माणिक तारडे, भागवत देशमुख, विजय बानकर, राम राजदेव, प्रभाकर हापसे, सरपंच प्रकाश बानकर, चंद्रभान राजदेव, नंदकुमार बल्लाळ, प्रकाश देशमुख, पोपट बानकर,आण्णासाहेब राजदेव, प्रभाकर साठे, दादासाहेब हापसे, बापूसाहेब नवाळे,जालींदर हापसे, विजय तारडे, शिवाजी राजदेव, प्रभाकर साठे, भास्कर तारडे, भाऊसाहेब खोसे, लष्मण नवाळे, नारायण हापसे, सोसायटीचे कर्मचारी पाडुरंग हापसे, बापूसाहेब ढेपे, गोवर्धन बानकर, आबासाहेब हापसे, सोपान देशमुख, आदी उपस्थित होते. यावेळी युवा आयडॉल पुरस्कार मिळाल्याबद्दल ब्राह्मणी व मोकळ ओहळ सोसायटीच्यावतीने गणेश हापसे यांचा संस्थेच्यावतीने सन्मान करण्यात आला. संस्थेच्या वसूलीवर परिणाम होत असल्याने उर्वरीत कर्ज माफी बाबत सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी. असा ठराव मोकळ ओहळ विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण बन्सी औटी यांनी मांडला. कर्ज माफीच्या आशेने नियमित कर्ज भरणारा शेतकरी थकबाकी भरण्यासाठी थांबला आहे. परिणामी संस्थेची कर्ज वसुलीस ब्रेक बसला आहे. त्यामुळे सरकारने याबाबत भूमिका स्पष्ट करावी. अशी भूमिका सभासदांनी मांडली. यावेळी सचिव गंगाराम मोरे यांनी मागिल सभेचे इतिवृत्त वाचून विविध विषयांवर चर्चा झाली. मोकळ ओहळ मधील लाभार्थीना रेशनवरील धान्य घेण्यासाठी चेडगावात जावे लागते. त्यामुळे सोसायटीस स्वतंत्र दुकान मिळावे अशी मागणी सभासदांकडून करण्यात आली. चेअरमन भाऊसाहेब औटी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित सभेत मोहन कदम, सुभाष ढोकणे, तुळशीराम कदम, ज्ञानदेव कदम, अंबादास कदम, अशोक औटी, जयराम औटी, विवेक गारकर,भाऊसाहेब औटी, भाऊसाहेब ढोकणे, गोरख घुगरकर,सह सचिव बबन कुऱ्हे आदी उपस्थित होते.
गणेश हापसे यांचा सन्मान
युवा आयडॉल (सामाजिक पत्रकारीता) पुरस्कार मिळाल्याबद्दल ब्राह्मणी व मोकळ ओहळ सहकारी सोसायटीच्या वतीने सर्वसाधारण सभेत सभासद गणेश हापसे यांचा सन्मान करण्यात आला.

Post a Comment