लंके समर्थकांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा
माय नगर वेब टीम
पारनेर - पारनेर- नगर मतदारसंघात राष्ट्रवादी कडून इच्छुक असलेले निलेश लंके यांच्या दोन कार्यकर्ता विरोधात आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शैलेंद्र मधुकर शिंगवे धंदा-(उपअधीक्षक भुमी अभिलेख पारनेर) यांनी फिर्याद दिली आहे.
वैभव राजेंद्र लोंढे,राजेंद्र नाथा लोंढे (रा.हंगा) अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहे.
राज्यात विधानसभेच्या निवडणूकीची आचारसंहिता लागू झाली आहे. शनिवारी (दि.२८) सायंकाळी ५.३० वाजता पारनेर तालुक्यातील हंगा येथे वैभव राजेंद्र लोंढे,राजेंद्र नाथा लोंढे (रा.हंगा) यांच्या ताब्यात असलेली कार (एम.एच-१२ एच एफ ८२९७) घेऊन फिरत होते. त्यावेळी कर्तव्यवर असलेले शैलेंद्र शिंगवे यांना कारच्या मागे असलेल्या मोठ्या काचेवर राष्ट्रवादीचे निलेश लंके व पक्षाचे मोठे चिन्ह असलेले पोस्टर लावून गाडी फिरवत होते. विधानसभा निवडणूकीची आचारसंहीतेचा सुरू असून आचारसंहिता भंग केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पुढील तपास पो.स.इ.कोसे करत आहे
Post a Comment