आमदार संग्राम जगताप- माजी महापौर अभिषेक कळमकर यांचे 'सेटलमेंट'
माय नगर वेब टीम
अहमदनगर - आमदार संग्राम जगताप व माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्यात बंद खोलीत झालेल्या वाटाघाटीत माझा संबध नाही. त्यांच्यात सेटलमेंट झाल्यामुळेच फिर्याद तयार असून देखील स्वतः कळमकर यांनी दिली नाही आणि माझी देखील देऊ दिली नसल्याचा आरोप राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष किरण काळे यांनी
पत्रकार परिषदेत केला.
शनिवारी नंदनवन लॉन येथे येथे शरद पवार यांची सभा संपन्न झाली. सभेनंतर आ.जगताप व माजी महापौर अभिषेक कळमकर याच्यात वाद झाले. हे वाद थेट पोलीस ठाण्यात गेले होते. मात्र राष्ट्रवादीच्या काही जेष्ठ नेत्यांनी मध्यस्ती करत वाद मिटवले. दरम्यान महापालिकेच्या महापौर निवडणूकीनंतर जगताप व कळमकर यांच्यात राजकीय संघर्ष सुरू झाल्याची खमंग चर्चा समाज माध्यमात सुरू होती. राष्ट्रवादीतील दोन गटातील संघर्ष शरद पवार यांच्या सभे नंतर झालेल्या वादातुन दिसून आला. अभिषेक कळमकर यांनी आज पत्रकर परिषद घेत आपली भूमिका सविस्तरपणे माध्यमासमोर मांडली. दरम्यान किरण काळे यांनी स्वतंत्र पत्रकार परिषद घेते थेट आमदार जगताप व माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्यावर निशाण साधला.
पुढे बोलतांना काळे म्हणले, कालच्या घटनेमुळे शहरात अत्यंत भीतीमय वातावरण यामुळे निर्माण झालेले आहे. खरंतर काल घडलेल्या प्रकारानंतर कळमकर यांनी सुरुवातीला घेतलेली आक्रमक भूमिका आणि नंतर सेटलमेंट करून करून त्यावर टाकलेला पडदा याचे मला फारसे आश्चर्य वाटत नाही. कारण अहमदनगर शहराला माहिती आहे जगताप आणि कळमकर या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचे ते म्हणाले.

Post a Comment