मतांसाठी शरद पवारांचे 'ते' वक्तव्य दुर्दैवी – पंतप्रधान नरेंद्र मोदी



माय नगर वेब टीम
नाशिक - जम्मू काश्मीरमधून ३७० कलम हटवण्यावरून टीका केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीका केली आहे. मतांसाठी शरद पवारांकडून काश्मीर मुद्द्यावर अपप्रचार केलं जाणं दुर्देवी असल्याचं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. नाशिकच्या सभेत बोलताना नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांवर जाहीर टीका केली. व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील, पंकजा मुंडे, गिरीश महाजन, एकनाथ खडसे, उदयनराजे भोसले आदी उपस्थित होते.

“काँग्रेस गोंधळलं आहे हे समजू शकतो. पण शरद पवार यांच्यासारखा अनुभवी नेता काही मतांसाठी चुकीचं विधान करत असेल तर फार दुख होतं. शरद पवारांना शेजारी देश चांगला वाटतो. ही त्यांची इच्छा. तेथील नेते त्यांना कल्याणकारी वाटतात. पण हे संपूर्ण देशाला माहिती आहे की, दहशतवाद्यांची फॅक्टरी कुठे आहे ? हिंसाचार शोषण झाल्याचे फोटो कुठून येतात ?,” असं नरेंद्र मोदींनी सांगितलं.

“काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जे सहकार्य करायला हवं होतं ते दिसत नाही. विरोधक म्हणून त्यांनी सरकार, माझ्यावर टीका करणं त्यांचा हक्क. पण राष्ट्रहिताच्या बाबतीत असं बोलणं जे शत्रुंसाठी फायद्याचं होईल, त्यावरुन भारतावर टीका होणं दुर्दैवी आहे. अशा लोकांना ओळखणं गरजेचं आहे,” असंही नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.

पंंतप्रधान म्हणाले, नाशिकला आम्हाला संरक्षणाचे महत्वाचे केंद्र बनवायचे आहे. त्यासाठी योजना आखली जात आहे. महाराष्ट्राच्या विस्तीर्ण अशा सागर किनार्‍याच्या विकासासाठी अदीच लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यातील मोठा भाग महाराष्ट्राला मिळणार आहे. तेथील बंदरे अधिक मजबूत करून रोजगाराच्या नव्या संधी निर्माण लकरण्यावर सरकारचा भर आहे.

फडणवीस सरकार हे विकासासाठी कटीबध्द असणारे सरकार आहे. जलयुक्त शिवारचे कामप्रशंसनीय आहे. १७ हजार गावे यातून जलसंकटमुक्त झाली आहेत. या कामाला येत्या पाच वर्षात गती द्यायची आहे. या सरकारने रोजगाराच्या संधी निर्माण केल्या. पर्यटनाला चालना दिली आहे, असे ते म्हणाले.

बोलघेवड्यांनो, सर्वोच्च न्यायलयावर विश्वास ठेवा
गेल्या दोन तीन आठवड्यात काही बोलघेवडे राममंदिराविषयी वक्तव्य करत आहेत. त्यांनी सर्वोच्च न्यायलयावर विश्वास ठेवला पाहिजे, अशा शब्दात पंतप्रदान नरेंद्र मोदी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे नाव घेता शरसंधान केले. शरद पवार यांच्याही नावाचा उल्लेख करत ते देशाच्याविरोधी वक्तव्य करत असल्याबद्दल पंतप्रदानांनी आश्‍चर्य व्यक्त केले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post