... अखेर नारायण राणेंच्या प्रवेशाचा मुहूर्त ठरला


माय नगर वेब टीम
मुंबई: महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असून. या भेटीत राणेंच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरला असल्याची माहिती समोर येतीये. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील गरवारे क्लब मध्ये 2 ऑक्टोबरला राणे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत .

मागील बऱ्याच दिवसांपासून दिवसांपासून राणेंच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू होती. परंतु राजकीय समीकरणांमुळे हा प्रवेश अनेकदा पुढे ढकलला होता. आता अखेर 2 ऑक्टोबरला गरवारे हॉलमध्ये संध्याकाळी 4 वाजता राणे भाजपमध्ये होणार आहेत. राणे यांच्या बरोबर नितेश राणे आणि निलेश राणे हेदेखील भाजपचा झेंडा हाती घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान राणेंच्या प्रवेशाला शिवोवसेनेकडून विरोध राहिलेला आहे. त्यामुळे आता शिवसेना राणेंचा प्रवेश मान्य करणार का ? हे पाहणे औस्सुक्याचे ठरणार आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post