माय नगर वेब टीम
अहमदनगर- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिले पाच वर्षे व आत्ताचे सहा महिन्यांपासून ज्या पद्धतीने देशाचा विकास केला तो आतापर्यंत कोणीही करु शकले नाही. अशा कर्तृृत्व संपन्न पंतप्रधान शतायुष्य व्हावे यासाठी त्यांचा वाढदिवस देशासह परदेशातही उत्साहात साजरा होत आहे. नरेंद्र मोदी तेली समाजाचे असले तरी त्यांनी सर्व जाती-धर्मासाठी काम करुन योजना राबविल्या आहेत. स्वच्छ भारत अभियान, प्लॅस्टिकमुक्त भारत अभियान सध्या सर्वत्र प्रभावीपणे राबविले जात आहे. प्लॅस्टिकमुक्त भारत या अभियानाला प्रतिसाद देत नगरच्या तेली समाजानेही प्लॅस्टिकमुक्त नगर करण्याचा केलेला संकल्प कौतुकास्पद आहे, असे सांगून भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष दिलीप गांधी यांनी नगर शहर प्लॅस्टिकमुक्त करण्याची सामुहिक शपथ सर्व नागरिकांसमवेत घेतली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवसानिमित्त तेली समाज महासभेच्यावतीने व श्री संताजी पतसंस्थेच्या सहकार्याने तेलीखुंट येथे आयोजित कार्यक्रम भाजपा शहर जिल्हाध्यक्ष दिलीप गांधी यांच्या हस्ते कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी उपमहापौर मालन ढोणे, तेली समाजाचे हरिभाऊ डोळसे, पतसंस्थेच्या चेअरमन शिला देवकर, मीरा डोळसे, निता लोखंडे, प्रकाश सैंदर, सोमनाथ देवकर, कृष्णकांत साळूंके, प्रभाकर देवकर, गोकूळ काळे, भाजपा सरचिटणीस किशोर बोरा, चेतन जग्गी आदींसह भाजपाचे पदाधिकारी व तेली समाजाचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलतांना हरिभाऊ डोळसे म्हणाले, जी व्यक्ती देशाला विकासाच्या दिशेने नेण्यासाठी सक्षम निर्णय घेत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी तेली समाजाचे असल्याचा सार्थ अभिमान सर्व तेली समाजाला आहे. त्यांचा वाढदिवस सेवा सप्ताह म्हणून साजरा होत आहे. या उपक्रमात तेली समाज सहभागी होऊन प्लॅस्टिकमुक्त नगर करण्याच्या दृष्टीने एक पाऊल टाकत कापडी पिशव्याचे वितरण नागरिकांना केले आहे.
कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रभाकर देवकर यांनी केले. आभार गोकूळ काळे यांनी मानले. यावेळी कालिंदी केसकर, ज्योती सैंदाणे, सिंधू शिंदे, राजू दारुणकर, गणेश धात्रक, ज्ञानेश्वर काळे, प्रशांत मुथा, अॅड.विवेक नाईक, अभिजित ढोणे, कुमुदिनी जोशी, आशा सैंदाणे, मिनीनाथ मैड, भैरवनाथ खंडागळे, संतोष शिरसाठ, अशोक भोसले, लक्ष्मीकांत तिवारी, संदिप पवार, अभिजित ढोणे आदिंसह नागरिक उपस्थित होेते.
Post a Comment