शिवसेना- भाजपाची युती फायनल ; संयुक्त पत्रकाद्वारे घोषणा


माय नगर वेब टीम
मुंबई - अनेक चर्चांनंतर अखेर एका संयुक्त पत्रकाद्वारे सोमवारी (दि.३०) भाजपा-शिवसेना महायुतीची घोषणा करण्यात आली. या पत्रकावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथील कार्यक्रमात युतीच्या घोषणेचा पुनरुच्चार केला. युती झाल्यामुळे युतीच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.




0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post