अवघ्या 6 मिनीटात विद्यार्थ्यांनी सोडवले गणितचे पेपर


माय नगर वेब टीम
अहमदनगर - युनिव्हर्सल अबॅकस अ‍ॅण्ड वैदिक मॅथस असोसिएशन आयोजित जिल्हास्तरीय अबॅकस स्पर्धा सावेडी येथील बंधन लॉनमध्ये उत्साहात पार पडली. या स्पर्धेला जिल्ह्यातून दोनशे पेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी झाले होते. सकाळी या स्पर्धेला प्रारंभ झाले. विद्यार्थ्यांनी मोठमोठी गणिते झटपटपणे सोडवित अवघ्या 6 मिनीटाच्या आतमध्ये आपला पेपर सोडवित उपस्थितांना अवाक केले.
ही स्पर्धा ज्युनिर लेवलसह पहिल्या ते पाच लेवल पर्यंन्त झाली. 6-6 मिनीटाच्या राऊंडमध्ये अवघड गणिती प्रक्रियेचे पेपर विद्यार्थ्यांनी अत्यंत जलदगतीने सोडविली. स्पर्धेनंतर विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम रंगला होता. यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध कलागुणांचे सादरीकरण करुन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
दुपारच्या सत्रानंतर पारितोषिक वितरण कार्यक्रमाचा शुभारंभ दीपप्रज्वलनाने झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार अ‍ॅड.बाळ ज. बोठे पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी महापौर अभिषेक कळमकर, सिनर्जी सायन्स अ‍ॅकॅडमीचे दत्ता पोंदे, नगरसेविका दिपाली बारस्कर, डॉ.बाळासाहेब काळे, प्राचार्य किशोर तळेकर, प्राचार्या जयश्री मेहेत्रे, दौंडचे पी.आय. सुनिल म्हाडिक उपस्थित होते. पाहुण्यांचे स्वागत सुनिल काळाणे यांनी केले. प्रास्ताविकात हेमलता काळाणे यांनी अबॅकस फक्त गणित विषया पुरता मर्यादीत नसून, यामुळे विद्यार्थ्यांच्या बुध्दीमत्तेला चालना मिळते. अबॅकसमध्ये पारांगत झालेला विद्यार्थी इतर विषयातही आपली गुणवत्ता सिध्द करीत असल्याचे स्पष्ट केले.
दत्ता पोंदे यांनी स्पर्धा परिक्षेसाठी विद्यार्थ्यांना तयार करण्याकरिता अबॅकस हा सर्वोत्तम पर्याय आहे. अबॅकसने मोठ-मोठ्या गणिताची प्रक्रिया काही क्षणातच सोडविता येत असल्याचे सांगून, त्यांनी राष्ट्रीय पातळीवरील गणित व विज्ञानच्या स्पर्धा परिक्षासंदर्भात मार्गदर्शन केले. दिपाली बारस्कर यांनी अबॅकस फक्त गणिती प्रक्रियेसाठी नसून, विद्यार्थ्यांची बुध्दीमत्ता वाढत असल्याचे त्यांनी स्वत:च्या मुलाचा अनुभव सांगितला. अभिषेक कळमकर यांनी स्पर्धा कोणतीही असो त्यामध्ये सहभाग महत्त्वाचा असतो. प्रयत्न केल्यास यश निश्‍चित मिळणार असून, पुस्तकी शिक्षणाबरोबर स्पर्धेत टिकण्यासाठी विद्यार्थ्यांना स्मार्ट शिक्षणाची गरज असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. अ‍ॅड.बाळ ज. बोठे म्हणाले की, स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी गुणवत्तेशिवाय पर्याय नाही. गुणवत्ता प्राप्त करण्यासाठी बुध्दीचा विकास झाला पाहिजे. बौध्दिक पातळी वाढविण्याचे काम अबॅकस करीत असते. अबॅकसने मुलांमध्ये एकाग्रता, वैचारिक गती व गुणवत्ता वाढीस लागत असल्याचे सांगितले.
या स्पर्धेत विविध गटातून क्षितीज गर्जे, आयुश धापटकर, साई शिंदे, परम गांधी, हर्षराज काळाणे, ओम पिसाळ, आर्यन फल्ले, प्रतिक्षा गिते यांनी प्रथक क्रमांक पटकाविला. तर केतकी मुरकुटे, आदित्य तांदळे, अमित कडू, श्रेयश घालमे, साईराज साळुंके, तन्मय गाली हे या स्पर्धेचे चॅम्पियन ठरले. या विजेत्या स्पर्धकांसह विविध गटातील द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ वजेत्यांना उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. यावेळी स्पर्धेत सहभागी झालेले जिल्ह्यातील स्पर्धक व त्यांचे पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्पर्धेचे परिक्षण विकास गोरे, दादा घालमे, अमोल देशमुख, संतोष काकडे यांनी केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संतोष मडके, प्रतिक शेकटकर, सुनिल जाधव, उज्वला मुरकुटे, शितल धापटकर, आप्पा लाढाणे, सुधीर गव्हाळे, अभिजीत शिर्के, डॉ.हर्षदा शिरसाठ आदींसह युनिव्हर्सल अबॅकस अकॅडमीच्या सहकार्‍यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.अमोल बागुल यांनी केले. आभार ऋग्वेदि काकडे यांनी मानले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post