सर्वांना सोबत घेऊन नगर शहराला पुढे नेण्याचे काम करणार


माय नगर वेब टीम
अहमदनगर -
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कायम सक्षम निर्णय घेण्यासाठी मागेपुढे पहिले नाही. देशाच्या व नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने त्यांनी धडाक्याने निर्णय घेतले. ३७० कलम हि रद्द केला. भारतीय जनता पार्टी हि जनतेचे प्रश्न दूर करणारी पार्टी आहे. जसे आज या विद्यालयच्या सौरक्षण भिंतीच्या कामाचे उद्घाटन झाले तसेच या विद्यालयला आवश्क असणारे खेळण्या सुध्दा आम्ही उपलब्ध करून देऊ. सर्वांनाच सोबत घेऊन नगरशहराला पुढे नेण्याचे काम करणार, असे प्रतिपादन महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केले.


उपनगर येथील गुलमोहर रस्त्यावर असणारी आनंद शाळेच्या सौरक्षण भिंतीच्या कामाचे शुभारंभ महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आले. यावेळी सभागृहनेता स्वप्निल शिंदे, नगरसेवक योगीराज गाडे, नगरसेविका ज्योती गाडे, शोभा बोरकर, तुषार पोटे, किशोर वाकळे, अभिजित चिप्पा, पुष्कर कुलकर्णी, अशोक सोनवणे, विलास शेटे, दिलीप आकोलकर, योगेश भापकर, सुधाकर बोरकर, विश्वनाथ दगडखैर, किसन टरटे, सुनील कानवडे, साहेबराव नागरगोजे, शरद झवर सह शिक्षकवर्ग उपस्थित होता.


या शुभारंभनंतर महापौरांनी नाली चोकप झाल्याने शाळे बाहेर रस्त्यावर घाणपाणी वाहत असल्याची पाहणी केली आणि तातडीने दुरुस्तीचे आदेश दिले व याठिकाणी खराब झालेला रस्ता नवीन करून देऊ असे शाळेच्या सदस्यांना सांगितले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post