बनावट दारू विक्री करणाऱ्या रॅकेटवर छापा ; दोघांना बेड्या, सूत्रधार फरार



माय नगर वेब टीम

अहमदनगर -

गोव्यातील दारू दुसऱ्या बाटल्यांत भरून विक्रीचे रॅकेट चालविणाऱ्या जामखेड येथील अड्ड्यावर उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकून तब्बल दहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच दोघांना अटक करण्यात आली आहे. मुख्य सूत्रधार फरार आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने जामखेड तालुक्यातील हॉटेल साईराम येथे छापा टाकला. तेथून महेश शिवाजी इकडे (रा. झिकरी, ता.जामखेड, जि.अहमदनगर) व ऋषिकेश अशोक काकडे (रा. बोरले, ता.जामखेड) यास अटक करुन त्याचे ताब्यातून महाराष्ट्रात बंदी असलेल्या गोव्यातील विदेशी मद्याचे ५७ बॉक्सेस, प्लास्टीकचे सिलकॅप-२८ हजार, पत्री बुच-२ हजार व मेकडॉल व्हीस्कीचे अंदाजे ५ हजार लेबल, रिकाम्या बाटल्या- १० हजार असा साठा जप्त केला.




तसेच विदेशी मद्याचा चाेरुन वाहतूक करण्यासाठी इंडिगो कार (एम.एच.१२.के.एन.१९७७) असा एकूण – १० हजार ३ हजार लाख ६२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच सदर गुन्हयातील मुख्य सूत्रधार आरोपी नामे भाऊसाहेब पाटिल गरड या इसमास फरार घोषित करण्यात आलेले आहे.




ही कारवाई उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक पराग उपअधीक्षक सी. पी. निकम, निरीक्षक ए.बी.बनकर ए. व्ही. पाटिल, संजय सराफ, बी. बी. हुलगे, डी. बी. पाटील, रानमळकर आदींच्या पथकाने केली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post