‘होय मी पवार साहेबांसोबत’; सोशल मीडियावर मोहीम
माय नगर वेब टीम
आगामी विधानसभा निवडणुकीत आपले राजकीय अस्तित्व शाबूत ठेवण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते भाजप जाणीव शिवसेनेच्या आश्रयाला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई शहर अध्यक्ष सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. तर राष्ट्रवादी महिला काॅंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी आपला राजीनामा दिला आहे. येत्या ३० तारखेला चित्राताई वाघ यांच्यासह काही आमदार भाजपात प्रवेश करणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे.
एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला वेगाने गळती लागली असताना दुसरीकडे मात्र राष्ट्रवादीच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी आम्ही शरद पवार यांच्या सोबतच होतो आणि राहणार अशी मोहीम सोशल मीडियावर सुरू केली आहे. ‘होय मी शरद पवार साहेब यांच्या सोबत आहे.’ अशा ‘टॅगलाईन’ने ही मोहीम सध्या सोशल मीडियावर सुरू आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील असंख्य कार्यकर्त्यांनी आतापर्यंत स्वतःची छायाचित्रे टाकत ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शरद पवार यांच्यासोबत असल्याचे सोशल मीडियावरून सांगत आहे.
Post a Comment