ढिसाळ कारभारामुळे अकरा छावण्यांची मान्यता रद्द ;  ४२ छावण्यांना ठोठावला दंड



माय नगर वेब टीम
अहमदनगर - छावणीच्या संचलनात आढळलेला बेशिस्तीचा कारभार आणि ढिसाळ व्यवस्थापनामुळे काल जिल्ह्यातील ११ चारा छावणीचालक संस्थांना छावण्या बंद करण्याचे फर्मान जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जारी केले. कर्जत मधील ७ व नगर तालुक्यातील ४ चारा छावण्यांचा यात समावेश आहे. त्याचबरोबर तपासणीच्या दरम्यान आढळलेल्या त्रुटी आणि अटी-शर्तीचे उल्लंघन केल्याप्रकरणी ४२ चारा छावणी चालक संस्थांवर १ लाख ८० हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे. या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे.

गतवर्षीच्या अपुऱ्या पावसामुळे जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. या परिस्थितीत शेतकऱ्यांचे पशुधन जगविण्यासाठी राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार जिल्हाधिकारी द्विवेदी यांच्या मान्यतेनुसार अटी व शर्ती जिल्ह्यात तब्बल ५११ चारा छावण्या मंजूर झाल्या. जूनपर्यंत यापैकी ५०४ चारा छावण्या सुरू होत्या. त्यात दाखल असलेल्या लहान-मोठ्या पशुधनाची संख्या ३ लाख ३६ हजार इतकी झाली होती.

 दरम्यान जूनपासून मागील दीड महिन्याच्या अवधीत जिल्ह्यात सुरू झालेल्या पावसामुळे चारा छावण्यांची संख्या घटली. जुलैच्या सुरुवातीला साडेतीनशे चारा छावण्या बंद झाल्या होत्या. मात्र, पावसाने हुलकावणी दिल्याने पुन्हा चारा छावण्यांची संख्या वाढली आहे. शेतकऱ्यांच्या पशुधनाच्या सुविधेसाठी सुरू असलेल्या चारा छावण्यातून योग्य पद्धतीने सुविधा मिळतात का यासाठी जिल्हा प्रशासन पहिल्यापासून सतर्क राहिले.

जिल्हाधिकारी द्विवेदी यांच्या निर्देशानुसार चारा छावण्यांच्या व्यवस्थापनाची तपासणी नियमितपणे सुरू आहे. तपासणीमध्ये त्रुटी व व अटी, शर्तींची उल्लंघन केल्याप्रकरणी चारा छावणी चालक संस्थांवर आज पावेतो साठ लाख रुपये दंडाची कारवाई करण्यात आली आहे. तपासणीमध्ये चारा छावणी संचालनात गैरव्यवस्थापन आढळल्याप्रकरणी ११ छावण्यांची मान्यता रद्द करीत त्या बंद करण्याचे आदेश काल जिल्हाधिकारी यांनी जारी केले. मागील दोन आठवड्यात महसूल ,सहकार आणि जिल्हा परिषदेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची पथके छावणीच्या तपासणीसाठी नियुक्त करण्यात आली होती.

या पथकांकडून तपासणीचे अहवाल प्रशासनास प्राप्त झाली. त्या अहवालानुसार बेचाळीस चारा छावणी चालक संस्थांवर १ लाख ८० हजार रुपये दंडात्मक कारवाईचे आदेश देखील जारी करण्यात आली आहेत.

दरम्यान कर्जत तालुक्यातील सोनाळवाडी गावात छावणी चालवणाऱ्या संस्थेवर शुक्रवारी रात्री संबंधित गावच्या कामगार तलाठी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार फसवणुकीचा गुन्हा कर्जत पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. रोकडेश्वर शिक्षण संस्था व ग्रामविकास प्रतिष्ठान असे या संस्थेचे नाव आहे.


या संस्थांची मान्यता केली रद्द
भागिरथीबाई सह.पाणी उपसा संस्था,साई सेवाभावी संस्था, रोकडेश्­वर शिक्षण संस्था, संकल्प ग्रामीण विकास संस्था, गुरूकृपा विकास संस्था, खुरेंगेवाडी पाईप फिटींग मजूर सहकारी संस्था, जगदंबा मोटार वाहतूक सहकारी संस्था या कर्जत तालुक्यातील सात आणि नगर तालुक्यातील विशाल सहकारी दूध उत्पादक संस्था, शेतकरी ग्रामविकास संघ, चांगदेव नारायणडोहो विकास कार्यकारी सेवा सोसायटी, यशांजली ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था. या चार अशा एकूण ११ संस्थाची चारा छावणी मान्यता रद्द करीत या छावण्या बंद केल्याचे आदेशात नमूद केले आहे. 

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post