World Cup 2019 | विश्वचषकाच्या साखळीत टीम इंडियाचा अखेरचा सामना आज श्रीलंकेशी





माय नगर वेब टीम

लीड्स : विश्वचषकाच्या साखळीत टीम इंडियाचा अखेरचा सामना आज श्रीलंकेशी होत आहे. हा सामना लीड्सच्या हेडिंग्लेवर खेळवण्यात येईल. भारतीय संघाने आठपैकी सहा सामने जिंकून विश्वचषकाच्या उपांत्य फेरीचं तिकीट आधीच कन्फर्म केले आहे. त्यामुळं श्रीलंकेविरुद्धचा हा सामना म्हणजे टीम इंडियासाठी उपांत्य फेरीची पूर्वतयारी ठरणार आहे.

भारताची मधली फळी विश्वचषकात सातत्यानं अपयशी ठरली आहे. मधल्या फळीच्या फलंदाजांना त्यांचा आत्मविश्वास पुन्हा मिळवण्यासाठी या सामन्यात संधी मिळणार आहे. स्ट्राईक रेट उंचावण्यात अपयशी ठरलेल्या धोनीला सूर मिळणं हे टीम इंडियाच्या दृष्टीनं महत्त्वाचे आहे.

श्रीलंकेचा संघ 1999 नंतर पहिल्यांदाच बाद फेरीआधीच गारद झाला आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी हा औपचारिक सामना असला तरी विराटसेनेला मात्र उपांत्य फेरीच्या तयारीसाठी ही चांगली संधी आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post