मुख्यमंत्र्यांनी केली आठ जिल्ह्यांसाठी पालकमंत्र्यांची नियुक्ती
माय नगर वेब टीम
मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आठ जिल्ह्यांसाठी पालमंत्र्यांची नियुक्ती केली आहे. अमरावती, पालघर, भंडारा, गोंदिया, हिंगोली, वर्धा, बुलढाणा, आणि गडचिरोली या आठ जिल्ह्यांचे पालकमंत्री नियुक्त करण्यात आले आहेत.
कृषीमंत्री अनिल बोंडे यांची अमरावतीचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे पालघरची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
राज्यमंत्री परिणय फुके यांची भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर राज्यमंत्री अतुल सांवे यांची हिंगोलीचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान, कामगार मंत्री संजय कुटे यांच्याकडे बुलढाणा जिल्ह्याची जबाबबदारी सोपवण्यात आली आहे.
Post a Comment