त्यांना ' ट्रॅप ' मधून वाचविण्यासाठी चित्रा वाघ यांनी सोडली राष्ट्रवादी ?
माय नगर वेब टीम
मुंबई - राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांनी आपल्या पदाचा आणि पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादीचे अनेक नेते पक्षाला सोडचिठ्ठी देऊन शिवसेना आणि भाजपमध्ये प्रवेश करत असल्यानं राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ सरकारी नोकरीत होते. मात्र २०१६ साली त्यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा ट्रॅप झाला. ४ लाख रुपयांची लाच घेताना ते पकडले गेले. तेव्हापासून चित्रा वाघ बॅकफूटवर गेल्याचे, चित्र आहे.
आपले पती या प्रकरणातून सहीसलामत सुटावेत हे चित्रा वाघ यांचे प्रयत्न आहेत आणि त्यासाठी त्यांना भाजपची मदत लागेल. त्यामुळेच चित्रा वाघ भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
राष्ट्रवादीचा राजीनामा दिलेल्या चित्रा वाघ भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यामागील कारणाची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
Post a Comment