आदर्शगाव हिवरे बाजार येथे कारगिल शहीद जवानांना वृक्षलागवड करून आदरांजली
माय नगर वेब टीम
अहमदनगर -
२६ जुलै १९९९ रोजी कारगिल येथे शहीद झालेल्या जवानांना आदरांजली म्हणून आदर्श गाव हिवरे बाजार येथे २६ जुलै २०१९ रोजी ४०० वृक्षांची लागवड करण्यात आली. त्यात प्रामुख्याने वड, पिंपळ, कवठ, करवंद, बहावा, चिंच, सीताफळ, करंज, वावळा या वृक्षांची लागवड हिवरे बाजार येथील आजी माजी सैनिक, तसेच ग्रामस्थ यांनी श्रमदानातून केली.
आदर्शगाव योजना कार्याध्यक्ष तथा हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तसेच सदर वृक्षलागवडीसाठी बन्सी विठोबा ठाणगे (मेजर), रामचंद्र ठाणगे (मेजर), भाऊसाहेब ठाणगे (मेजर),लक्ष्मण ठाणगे (मेजर), भीमराज बांगर (मेजर), शरद लक्ष्मण पवार (मेजर), धर्मराज ठाणगे(मेजर), मंगेश ठाणगे (मेजर), नवीन ठाणगे (मेजर), दत्तात्रय ठाणगे (मेजर) यांनी विशेष परिश्रम घेतले.
Post a Comment