पंतप्रधान फळपिक योजनेचे पैसे न मिळाल्याने प्रहारचे जिल्हा बँकसमोर अर्ध नग्न आंदोलन



माय नगर वेब टीम

अहमदनगर

पंतप्रधान फळपीक विमा योजनेचे पैसे अद्यापही न मिळाल्याने प्रहार जनशक्तीच्या वतीने जिल्हा बँकेसमोर अर्ध नग्न आंदोलन करण्यात आले.

अहमदनगर जिल्ह्यातील फळउत्पादक शेतकर्‍यांनी जून 2018 मध्ये प्रधानमंत्री फळबाग विमा योजने अंतर्गत विमा कंपन्यांकडे बँक मार्फ़त विमा भरलेला आहे. यामध्ये मोसंबी, संत्रा, डाळिंब, व चिकू उत्पादक शेतकरी आहे. योजने अंतर्गत शेतकर्‍यांना 1 जून ते 15 ऑगस्ट विमा संरक्षण कालावधी होता. या वर्षी दुष्काळी परीस्थिती असल्यामुळे शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे. शेतकर्‍यांना मोबदला मिलणे विमा कंपन्यांना बंधनकारक असुन तो आजपर्यंत मिळालेला नाही.

अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या माध्यमातुन 10019 कर्जदार आणी 7 हजार 965 बिगर कर्जदार अशा एकूण 17 हजार 975 शेतकर्‍यांनी प्रधानमंत्री पिक विमा अंतर्गत पुनर्रचित हवामान आधारीत फळपीक विमा योजनेत सहभाग घेऊन सात कोटी 55 लाख 62 हजार विमा हप्ता भरला गेला होता. मात्र कर्जदार शेतकर्‍यांपैकी फक्त 9 हजार 448 शेतकर्‍यांना विमा रक्कम मंजूर झाली. यापैकी 571 शेतकरी वंचित राहीले आहेत. तर बिगर कर्जदार शेतकर्‍यांपैकी क्त 65 शेतकर्‍यांना विमा रकमचा लाभ मिळाला आहे. एकूण 8462 शेतकरी विमा भरपाई पासून वंचित राहीलेले आहेत.

या अर्धनग्न आंदोलनात प्रविण पिंपळे, आदेश गुंजाळ, अक्षय कांबळे, शुभम दासरी, गणेश चव्हाण, सिद्धार्थ सांगळे, बाळासाहेब चव्हाण, सनि पवार, लकी सोनवणे, दत्तात्रय गोडसे आदी उपस्थित होते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post