मुख्यमंत्री स्वत: आमदारांना फोन करताहेत – पवार




माय नगर वेब टीम
पुणे - विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर वाढलंय आहे. तसेच सत्ताधाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात फोडाफोडी होत आहे. नेते फोडण्यासाठी सरकारी एजन्सीचा वापर केला जात असून विरोधी आमदारांना ईडीद्वारे धमकावले जात आहे. त्याचप्रमाणे स्वत: मुख्यमंत्री आमदारांना फोन करत आहे’, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पुण्यातील पत्रकार परिषदेमध्ये केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांच्या राजीनाम्यानंतर अवघ्या एका दिवसाने पक्षाला दुसरा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सचिन अहिर यांच्याप्रमाणेच चित्रा वाघ यादेखील राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणार अशा चर्चा शुक्रवारी दिवसभर सुरू होत्या. शेवटी त्यांनी राजीनामा दिला आहे. यावर पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे की, ‘विरोधी आमदारांना धमकावले जात असून चित्रा वाघ आणि हसन मुश्रिफांना देखील धमकावले गेले आहे. तसेच चित्रा वाघ यांच्या पतीविरोधात असणाऱ्या केसेस सोडवण्यासाठी पक्षांतर केले आहे’, असल्याचे पवार यांनी सांगितले आहे. तसेच त्या पक्ष सोडण्यापूर्वी भेटून गेल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post