दहा हजार रुपयांची लाच घेणारा तो पोलिस कर्मचारी गजाआड




माय नगर वेब टीम
संगमनेर - चाप्टर केस मध्ये मदत करण्यासाठी दहा हजार रुपयाची लाच मागणार्‍या पोलिस कर्मचाऱ्यास अँटी करप्शनच्या पथकाने रंगेहात पकडले.
रामनाथ महादेव सानप (पोलीस नाईक नेमणूक संगमनेर पोलीस ठाणे)असे लाच मागणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहे.

तक्रारदाराच्या बहिणीचा नातू याच्याविरुद्ध संगमनेर शहर पोलिस स्टेशन येथे दाखल भादंवि 326 गुन्हा दाखल आहे. गुन्ह्यात दोषारोप सादर करण्यास केलेल्या मदतीचे मोबदल्यात व त्याचेवर चॅप्टर केस मध्ये मदत करण्यासाठी 11 जुलै रोजी 10 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीनंतर आज दहा हजार रुपये स्वीकारताना नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post