' त्या ' ठिकाणी येत्या 30 जुलैपर्यंत कृत्रिम पाऊस पाडणार : बबनराव लोणीकर



माय नगर वेब टीम
जालना -  पावसाने ओढ दिलेल्या मराठवाड्यात कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी राज्य सरकारने तयारी केली आहे. येत्या 30 जुलैपर्यंत मराठवाड्यात कृत्रिम पाऊस पाडला जाईल, अशी माहिती राज्याचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली आहे.

मराठावाड्यात कमी पावसामुळे नागरिकांची चिंता वाढली आहेत. त्यामुळे कृत्रिम पाऊस पाडण्याच्या दृष्टीने राज्य मंत्रिमंडळात चर्चा झाली आहे. राज्य सरकारने कृत्रिम पाऊस पाडण्याच्या दृष्टीने लागणाऱ्या परवानग्यांसाठी केंद्र सरकारकडे अर्ज केले आहेत, त्या परवानग्या लवकरच मिळणार आहेत. कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी लागणाऱ्या विमानाला औरंगाबाद विमानतळावरुन उड्डाणाची परवानगी घ्यावी लागणार आहे. तसेच कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी लागणारी रडार यंत्रणेचीही परवानगी घ्यावी लागणार आहे, अशी माहिती बबनराव लोणीकर यांनी दिली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post