शहरातील ' त्या ' मसाज पार्लवर रेड




माय नगर वेब टीम
अहमदनगर - पुणे बस स्थानक जवळील एक गळयात सुरू  असणाऱ्या मसाज पार्लवर डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाने आज शुक्रवारी दि.19 रात्री  8.30  वाजण्याच्या सुमारास रेड केली. यात एका महिलेसह पुरुषाला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. प्रदीपकुमार गोपालशेट्टी (रा. कर्नाटक) असे ताब्यात घेतलेल्या पुरुषाचे नाव आहे.

स्वस्तिक चौक येथील ब्लु डायमंड मसाज सेंटर येथे मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती डीवायएसपी संदीप मिटके यांना समजली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकला.या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post