नाल्यालगतच्या झोपड्या हटवणार






माय नगर वेब टीम


मुंबई - मुंबईत पावसानंतर तुंबणार्‍या पाण्याची समस्या दूर करण्यासाठी तातडीचा उपाय म्हणून नाल्याच्या रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे. नाल्यांजवळील 4 मजली झोपडपट्ट्या तातडीने हटवण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महानगरपालिकेला आदेश दिल्याची माहिती विधानसभेतील चर्चे दरम्यान दिली.
नाल्यालगत राहणार्‍या स्थानिकांचे तातडीने स्थलांतर करण्यात येणार असून, विरोध करणार्‍यावर करवाई करणार असल्याचे ते म्हणाले.
मुंबईत झालेल्या जोरदार पावसामुळे संपूर्ण मुंबईत पाणीपाणी झाले आहे. या पावसाचे पडसाद विधिमंडळाच्या अधिवेशनात उमटले. अधिवेशानात विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या चर्चेला उत्तर देताना झोपड्या हटवण्याचा कार्यक्रम जाहीर केला.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post